सिडनी – श्रद्धा आणि अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या घटना हा नेहमीच चर्चेचा विषय असतो भारतासारख्या देशात अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असतात आता ऑस्ट्रेलियाय तशी एक घटना समोर आले आहेत जी मुळात वैद्यकीय घटना आहे पण तरीसुद्धा त्या घटनेमध्ये चमत्कार आला आहे देशातील एका महिलेचे टॉन्सिलचे ऑपरेशन केल्यानंतर ती महिला अचानकच एका विदेशी भाषेमध्ये बोलू लागल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.
एंजि येन असे या महिलेचे नाव असून ती 29 वर्षीय आहे ती मूळची तैवानची असून वयाच्या आठव्या वर्षापासून ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे काही दिवसापूर्वी तिला टॉन्सिल्सचा त्रास जाणवत असल्याने तिने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा अचानक तिच्या बोलण्याचे उच्चार बदलले होते आणि ती एका विदेशी भाषेमध्ये आणि विदेशी उच्चारामध्ये आपले संभाषण करत होती ती जी भाषा बोलत होती किंवा तिचे उच्चार ज्या पद्धतीचे होते ती भाषा आयर्लंड मधली म्हणजेच आयरिश भाषा होती.
एंजिचा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही आयर्लंडचा संबंध आला नाही तरीसुद्धा तिच्या उच्चरावर आयरिस भाषेचा प्रभाव या शस्त्रक्रियेनंतर दिसून आला बाबत माहिती देताना संशोधक कार्ल यांनी सांगितले की हा एक अनोख्या अनोख्या प्रकारचा आजार आहे जगभरात शंभर लोकांना हा आजार जाणवतो त्याला फॉरेन अकसेंट सिंड्रोम या नावाने ओळखले जाते आणि हा आजार मेंदूशी संबंधित आहे या घटनेनंतर एंजिचे आयुष्यही बदलून गेले आहे.
ती एक दंतरोग चिकित्सक असून तिचे दररोज अनेकांशी संबंध येतो दररोज व्यावहारिक संबंध प्रस्थापित करताना तिला संभाषण करावे लागते त्यामुळे तिच्या या अनोख्या उच्चाराचा परिणाम तिच्या व्यवसायावरही आता होऊ लागला आहे आपल्या रुग्णांना तिला एकच गोष्ट अनेक वेळा सांगावी लागत आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फॉरेन एक्सेंट सिन्ड्रोम या आजाराचा पहिला रुग्ण 1907 मध्ये सापडला होता त्यानंतर आत्तापर्यंत जगभरात फक्त शंभर रुग्ण सापडले आहेत