पिंपरी, (प्रतिनिधी) – अनेकदा रुग्णसंख्या वाढल्यानंतर अत्यंत निकडीच्या शस्त्रकि्रयांना प्राधान्य दिले जाते आणि कमी निकडीच्या शस्त्रकि्रयेसाठी आलेल्या रुग्णांना वेदना सहन करत प्रतीक्षा करावी लागते. परंतु आता महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील हे चित्र बदलणर असून आणखी दोन शस्त्रकि्रया कक्ष (आॅपरेशन थिएटर) सुरु करण्यात येणार आहेत. सध्या एक शस्त्रक्रिया कक्ष आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता आणखीन दोन विभाग पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.
जिजामाता रुग्णालयात प्राथमिक उपचारासह प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या रुग्णालयात दिवसाकाठी ६०० रुग्णांची उपचारासाठी नोंद होत आहे. १३० बेडचे हे रुग्णालय असून १०० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल (अॅडमिट) होतात. या रुग्णालयात सध्या दहा बेडचा अति दक्षता विभाग आहे. रुग्णालयात महापालिका प्रशासनाच्या वतीने सुविधा पुरविल्या जात आहेत.
अलिकडेच रुग्णालयाला एक दुर्बिणही मिळाल्यामुळे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयात एकच शस्त्रक्रिया कक्ष आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शस्त्रक्रिया कक्ष वाढविणे गरजेचे होते. त्यानुसार रुग्णालयाकडून मागणी करण्यात आली होती. पुढील आठवड्यात दोन शस्त्रक्रिया कक्ष सुरू होतील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
महापालिका वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठांच्या सकारात्मक भूमिकेमुळे रुग्णालयात विविध सुविधा प्राप्त होत आहेत. सध्या रुग्णालयात एक शस्त्रक्रिया कक्ष आहे. पुढील आठवड्यात दोन शस्त्रक्रिया कक्ष होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले उपचार देण्यास मदत होणार आहे. – डाॅ. सुनिता साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी. जिजामाता रुग्णालय.