बारामती, (प्रतिनिधी)- येथील गिरीराज हॉस्पिटल (डॉ. भोईटे हॉस्पिटल) येथे यशस्वीरित्या पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी पहिल्यांदाच कार्डियाक रेसिन्क्रोनायसेशन विथ डिफिब्रिलेटर (सुपर पेसमेकर) शस्त्रक्रिया पार पडली. याबाबत गिरीराज हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रमेश भोईटे यांनी माहिती सादर केली.
दि. २७ मार्च रोजी गिरीराज हॉस्पिटलमध्ये डॉ. भोईटे यांना डॉ. हरिश्चंद्र अर्जुन ठोंबरे (रा. वाई, सातारा) हे भेटले, त्यांनी व्यथा सांगितली. त्यांना चालताना खूप धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, ते अचानक २ वेळा बेशुद्ध पडले, ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आधी स्वतः काही तपासण्या स्वतःच्या स्वतः करून घेतल्या परंतु त्यातून तसे काही विशेष आजार किंव्हा कारण मिळाले नाही, त्यांनी फोन करून सर्व सांगितले.
त्यांना थोडाही विलंब न करता हॉस्पिटलला बोलावले. त्यांच्या काही विशेष तपासण्या करून घेतल्या. त्यात असे निदर्शनास आले की, त्यांचे हृदयाचे ठोके कमी पडतात. हृदयाचे पंपिंग ही कमी झाले होते. त्यातून हृदयाची रक्तभिसरण प्रक्रिया देखील कमी झाली आहे. सहकारी हृदयरोग तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. पेशंट ला “Dilated Cardiomyopathy with severe LV Dysfunction” असा आजार झाल्याचे निदान झाले.
आजारात हृदयाचे जे स्नायू असतात. ते कमकुवत होऊन हृदयाचे पंपिंग खूप कमी झालेले असते, हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रणही बिघडते. आजारावर बायपास किंवा एन्जिओप्लास्टी करून कोणताही फायदा नाही होत, आजारासाठी पेशंटच्या हृदयात “CRT – D” असे मशीन बसवावी लागते. ही मशीन बसवायची असल्यास पेशंटला पुणे किंवा मुंबईला पाठ्वण्याशिवाय पर्याय नव्हते. पेशंटची परिस्थिती तशी नव्हती. रुग्ण आधीच खूप घाबरले होते.
अशा स्थितीत त्यांना प्रवास करायला लावणे धोक्याचे होते. सुदैवाने डॉ. चेतन अनिल भोळे (E. P. Specialist) Electro Cardiologist, जहांगीर हॉस्पिटल, पुणे यांच्याशी संपर्क झाला. त्यांना विनंती केली. त्यांनी ही शस्त्रक्रिया बारामतीत गिरीराज हॉस्पिटलला केली. हॉस्पिटलच्या टीमने सर्व शर्थीचे प्रयत्न केले.
(दि.२९) रोजी डॉ. चेतन भोळे आणि गिरीराज हॉस्पिटलचे भूल तज्ज्ञ डॉ. संतोष घालमे यांनी अवघड शाश्त्रक्रिया पार पाडली. पेशंट दि.४) एप्रिल रोजी सुखरूप घरी देखील गेले. सर्व डॉक्टर्स आणि इतर स्टाफमुळे पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी अशी सर्जरी करण्याचा सर्व प्रथम मान बारामती शहरातील गिरीराज हॉस्पिटलला मिळाला आहे.