Vikrant Massey: अभिनेता विक्रांत मॅसी 12वी फेल या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाखो लोकांना चित्रपटाच्या कथेने आणि विक्रांत मॅसीच्या अभिनयाने वेड लावले आहे. दरम्यान, 12वी फेलमध्ये दमदार काम दाखवल्यानंतर विक्रांतच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे.
विक्रांत मॅसी लवकरच प्रसिद्ध चित्रपट निर्माती एकता कपूरसोबत काम करणार आहे. तो एकताच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असेल. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. रंजन चंदेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या तरी या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 12वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 60 कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.
विधू विनोद चोप्रा यांनी ’12वी फेल’ चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या वास्तविक जीवनातील कथेवरून प्रेरित आहे. बारावी नापास झालेला मुलगा आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने कसा आयपीएस होतो आणि त्यासाठी तो खूप मेहनत करतो, या त्याच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट 29 डिसेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर देखील प्रदर्शित झाला आहे.