‘तानाजी’ची एन्ट्री होताच चित्रपटगृहात पैश्यांची उधळण

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत “तानाजी : द अनसंग वॉरियर” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसातच चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

तानाजी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः वेड लावले आहे. कोल्हापुरात तर अजय देवगणच्या चाहत्यांनी ‘तानाजी’ची एन्ट्री होताच चित्रपटगृहात पैशांची उधळण केली आहे. सध्या पैशांची उधळण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटात अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि अभिनेत्री काजोल अशी दमदार स्टार कास्ट आहे.

 

View this post on Instagram

 

At a theatre in Kolhapur, fans go crazy as they rain money watching @ajaydevgn’s entry scene from #Tanhaji

A post shared by Zoom TV (@zoomtv) on

दरम्यान, 100 करोड क्लबमध्ये स्थान मिळवणारा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या वर्षातला पहिला चित्रपट आहे. तसेच अभिनेता अजय देवगनचा हा बॉलिवूड मधील आतापर्यंतचा 100 वा चित्रपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.