नाशिक-मुंर्बचा पारा घसरला
मुंबई : देशात नवीन वर्ष हे थंडी घेऊन आले आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरात थंडी चांगलीच वाढली आहे. राज्यात किमान तापमानात घट नोंदवण्यात येत असल्याने जनतेला हुडहुडी भरली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकच्या निफाडमध्ये झाली आहे. आज सकाळी निफाडमध्ये 2.4 पर्यत तापमानाचा पारा घसरला. यंदाच्या मोसमातील ही सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद असल्याचे म्हटले आहे. काल निफाडमध्ये 9.4 एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली तर आज 2.4 तापमानाची नोंद झाली आहे. आज पारा 7 अंशाने घटल्याची नोंद झाली आहे.
MIN TEMP UPDATES FOR MUMBAI ON 17 JAN
COLABA
Min 14.5
Rh 50%SANTACRUZ
MIN. = 11.4 DEG C
R/H. = 62 %
Lowest min temp recorded after year 2013.
With the winds chill factor too coming in… Feels lower than actual.
Please do TC.
Day time temp are expected to be low. pic.twitter.com/r1kRSTgAP5— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 17, 2020
दरम्यान, मुंबईत तापमानाचा पारा घसरला असून आज सकाळी मुंबईकर थंडीत कुडकुडत घऱाबाहेर पडत आहेत. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.अचानक वाढल्याने मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीत पर्यटकांचे आवडते ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमधील निफाडमध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रात्री 9.4 अंश सेल्सिअस असणारं तापमान सात अंशांनी घसरेलले पहायला मिळाले.
दरम्यान धुळे येथे 6.6, औरंगाबाद 8.1, पालघऱ 14 आणि औरंगाबाद येथे 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पारा घसरत असून गुरुवारी कमाल तापमानही सरासरी एक ते दोन अंशांनी खाली उतरले होते.