नवी दिल्ली – कॉंग्रेसचे दिवंगत राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज सातव याला नुकत्याच झालेल्या आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत 98.3 टक्के मार्क मिळाले आहेत. आपले हे यश त्यांनी राहुल गांधींच्या कानी घालण्यासाठी त्यांनी आज त्यांची आपल्या मातोश्रींसमवेत दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीनंतर राजीव सातव यांच्या पत्नी व पुष्कराज याच्या मातोश्री डॉ. प्रज्ञा सातव यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मुलाच्या दहावीच्या परिक्षेतील यशाचा आनंद आमचे मार्गदर्शक व गॉडफादर राहुल गांधी यांच्या समवेत साजरा करण्यासाठी त्यांची भेट घेतली.
या भेटीबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचे आभारही मानले आहेत. राजीव सातव यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी व अन्य गांधी कुटुंबियांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही एका ट्विटर संदेशाद्वारे पुष्कराज सातव याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.
पुष्कराजने त्याच्या दिवंगत पित्यासाठी अभिमानास्पद ठरेल अशीच कामगिरी केली आहे असे थरूर यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.