पुणे – पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
मात्र पुणे शहरातील स्थानिक प्रशासनाने याला विरोध दर्शवला होता आणि पुणे शहरातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला होता. आता महापालिकेने महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय आजपासून घेतला आहे.
पुण्यातील ज्ञानगंगा इंग्लिश मेडियम शाळेत प्रशासनाने दिलेल्या नियमावलीच काटेकोरपणे पालन करून शाळेत विद्यार्थ्याच स्वागत करण्यात आलं आहे. गेल्या 2 वर्षानंतर शाळेत पून्हा एकदा येताना या चिमुकल्यांच्या चेहेऱ्यावर वेगळंच आंनद पाहायला मिळालं…
पुण्यात आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या नियमावलीच पालन करून शाळा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मामिटरने चेकिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझेशन याचा वापर करूनच विद्यार्थ्यांना शाळेत आत वर्गात सोडण्यात आलं.
आणि वर्गात देखील एकाच बेंचवर एक विद्यार्थी बसविण्यात आलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या पालकांनी शाळेला हमीपत्र दिल आहे अश्याच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं नाही.
अश्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणार आहे. अशी माहिती ज्ञानगंगा शाळेच्या मुख्यध्यापिक रेणुका दत्ता यांनी दिली आहे. महत्त्वाच म्हणजे अजूनही 40 टक्के पालकांनी हमी पत्र दिलेलं नाही.