राजीनाम्यानंतर विखे-पाटील थेट मंत्रालयात गिरीश महाजनांच्या भेटीला

मुंबई: काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण आज राजीनामा दिला आहे. पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत असल्याचे विखे पाटील म्हणाले. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील थेट गिरीश महाजनांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले, महाजनांच्या भेटीपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट म्हणजे भाजपमध्ये पक्ष प्रवेश फिक्स, असं समीकरण सध्या जुळल आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचे राजकारण जगजाहीर आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

दरम्यान, विखे पाटील हे काँग्रेसला खिंडार पाडून 10 ते 12 आमदारांना घेऊन भाजपममध्ये जातील अशी माहिती मिळत आहे. यामध्ये आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, नारायण पाटील, सुनील केदार, गोपाळदास अग्रवाल हे विखेसोबत भाजपात जाऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.