मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी चर्चेत येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकारण चांगलेच तापले असून या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र या भेटीचे मागचे कारण स्वतः ट्विट करून शरद पवारांनीच सांगितले आहे.
मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय… pic.twitter.com/Q6dSxeUMLR
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 1, 2023
शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आज (१ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.” असंही त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार @PawarSpeaks साहेब यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/m1btHd8n5q
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 1, 2023
दरम्यान, या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचे व्हिडीओ पोस्ट केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली.”