तुळशीबाग गणेश मंडळाने आयोजित केला होता कार्यक्रम
पुणे – गणेशोत्सव आणि गणेशविसर्जनादिवशी अग्निशमन दल जवानांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ दरवर्षी गणपती विसर्जन झाल्यावर येणाऱ्या चतुर्थीला अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी दलाच्या जवानांचा गौरव केला.
मंडळाकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर दलाकडून सॅनिटायझेशन करणे आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कार करणे हे महत्त्वाचे काम केले जात आहे. त्यामुळे यंदाचा गौरव महत्त्वपूर्ण होता.
मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनप्रसंगी शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे झाड पडाण्याच्या दोन-तीन घटना घडल्या आणि अग्निशमन दलाला कॉल आले. अशावेळी सन्मान न स्वीकारता अधिकारी व कर्मचारी लगेचच घटनास्थळी रवाना झाले आणि आपल्या कर्तव्यपर दक्षतेची प्रचिती दिली.
मात्र, त्यानंतर काही वेळाने प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान त्यांनी स्वीकारला, अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली. याप्रसंगी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, मंडळाचे उपाध्यक्ष मोहन साखरिया, किरण चौहान, प्रदीप इंगळे, जितेंद्र अंबासनकर, चकोर सुबंध, साई डोंगरे उपस्थित होते.