मुंबई – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. मराठीसह त्याने हिंदी बिग बॉसमध्ये देखील उत्तम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली. हिंदी बिग बॉसच्या 16 व्या पर्वात झळकल्यानंतर त्याने रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 13 ‘ मध्ये सहभाग घेतला. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यानंतर आता शिव एका पाठोपाठ एक रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत आहे. ‘खतरों के खिलाडी 13 ‘ संपताच शिव ठाकरची एका नव्या शो मध्ये एंट्री होणार आहे.
लवकरच डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा 11’ सुरू होणार आहे. या शोचे पोस्टर रिव्हील करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची चर्चा होत आहे. त्यानंतर या शोच्या निर्मात्यांनी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे.
या स्पर्धकांमध्ये अभिनेता शोएब इब्राहिम, अभिनेत्री करुणा पांडे, अड्रिजा सिन्हा, उर्वीशा ढोलकीया, आमिर अली, राजीव ठाकूर, अंजली आनंद, कुस्तीपटू संगीत फोगाट, आणि शिव ठाकरे या पर्वात दिसणार आहे. ‘झलक दिखला जा11’ मधील शिवचे पोस्टर पाहिल्यानंतर ‘रिऍलिटी शोचा किंग’, ‘शिव ठाकरे बेस्ट आहे’, अशा चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या शोमध्ये शिव ठाकरे पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 13 ‘च्या पर्वामध्ये डिनो जेम्स (Dino James) याने बाजी मारली. टॉप 5 स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरशीची लढत झाली होती. अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा, मराठमोळा शिव ठाकरे, डीनो जेम्स, रश्मीत कौर हे टॉप 5 स्पर्धक होते. यात डिनो जेम्स यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. तर अरिजीत तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांनी टॉप 3 पर्यंत मजल मारू शकले. तर मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा टॉप 5 पर्यंत पोहोचला.