Priyanka Chahar Chaudhary Troll| ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बिग बॉसमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंवरून नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पण या फोटोमध्ये तिचं नाक आणि ओठ वेगळं दिसत असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. प्रियांकाने लिप फिलर केले असावेत असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. ज्यामुळे ओठ हे नेहमीपेक्षा थोडे जाड दिसतात.
तिच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ‘तुझा चेहरा फारच विचित्र दिसत आहे’, ‘सुंदर दिसण्याच्या नादात काय करतात’ आणि ‘तू आधीच खूप सुंदर दिसत होती, आता चेहऱ्याची वाट लावून घेतली’, असे लिहिले आहे. दरम्यान, एकता कपूरच्या ‘नागिन 7’ मध्ये प्रियांका चहर दिसणार आहे. त्यामुळेच तिने हे नाक आणि ओठांची सर्जरी करून काहीतरी वेगळं दिसण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. Priyanka Chahar Chaudhary Troll|
View this post on Instagram
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘उडारिया’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर बिग बॉसमधील तिच्या खेळीने आणि फॅशन सेन्समुळे चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती. याआधी तिने रणदीप हुडासोबत एका म्युझिक अल्बममध्येही काम केला आहे. यानंतर ती तुषार कपूरसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यासंदर्भातला व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. Priyanka Chahar Chaudhary Troll|
हेही वाचा :
स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्यभूमिकेत