नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून खोट्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे देशातील अनेक सेलिब्रिटींची प्रतिमा खराब झाली आहे. या एआय (AI) तंत्रज्ञानाचे सिनेतारकही बळी ठरले आहेत. अलीकडे, रश्मिका मंदान्ना, काजोल, कतरिना कैफ (Bollywood actress deepfake) आणि सारा तेंडुलकर (Sara tendulkar) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या डीपफेक व्हिडिओंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. दरम्यान, आता आलिया भट्टचा डीपफेक (Alia bhatt) व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये महिला अश्लील हावभाव करताना दिसत आहे. (Alia bhatt deepfake video)
या डीपफेक व्हिडिओमध्ये आलियाचा चेहरा बसवलेली एक महिला अश्लील हावभाव करताना दाखवण्यात आली आहे. डीपफेक व्हिडिओंबाबत, केंद्र सरकारने म्हटले आहे की डीपफेक तयार करणे आणि प्रसारित करणे यासाठी एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. (Alia bhatt video viral)
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की केंद्र लवकरच अशा मजकूरावर योग्य कारवाई करण्यासाठी जबबादार व्यक्तीची नियुक्ती करेल. त्यांनी सोशल मीडिया कंपन्यांना डीपफेक आणि चुकीच्या माहितीच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना सांगण्यात आले आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सामग्री आणि चुकीची माहिती त्वरीत काढून टाकणे ही त्यांची जबाबदारी आहे.(Alia bhatt bold)
Alert 🚨 #deepfake#RashmikaMandanna#AliaBhatt After Rashmika Mandanna, Alia Bhatt’s Deepfake video is now being Circulated. pic.twitter.com/2HqrsiNHhG
— L O K I – God Of Multiverse (@DDieheart) November 27, 2023
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना सात दिवसांच्या आत आयटी कायदा आणि नियमांसह त्यांच्या वापराच्या अटींची यादी करण्यास सांगितले आहे. चंद्रशेखर यांनी मंत्रालयात सोशल मीडिया कंपन्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या सूचना दिल्या आहेत.