मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’चा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’ होता, तेव्हापासून जवळपास दरवर्षी सारा नक्कीच केदारनाथला जात असते. यावेळीही ती बाबा केदारच्या दर्शनासाठी पोहोचली आणि चाहत्यांना तिने शूट केलेली प्रत्येक खास जागा दाखवली आणि जी अजूनही तिच्या आठवणींमध्ये जिवंत आहे. सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती केदारनाथमध्ये असल्याचं दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये सारा अली खान केदारनाथच्या बर्फाळ मैदानात उभी असलेली दिसत आहे आणि त्याचवेळी तिने शूट केलेली ठिकाणे ही दाखवली आहेत. तसेच ती त्याच रेस्टॉरंटमध्ये पोहोचली जिथे तिने केदारनाथ चित्रपटात मॅगी खाताना शॉट दिला होता. त्या लोकांना भेटल्यानंतर सारा खूप आनंदी दिसत होती.
View this post on Instagram
यासोबत साराने लिहिले… ‘ज्या दिवसात मला परत जायचे आहे. काहीही बदलण्यासाठी नाही, परंतु काही गोष्टी पुन्हा अनुभवण्यासाठी. पण मला वाटतं आजचे क्षण उद्याच्या आठवणी आहेत.’ असं ती म्हणते. साराच्या चाहत्यांनी या पोस्टवर खूप प्रेम केले, परंतु त्याच वेळी त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतला खूप मिस केल्याचं दिसून येत आहे.
2018 मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून केलं पदार्पण…
सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि लोकांना तो खूप आवडला होता. या चित्रपटात सारा सुशांत सिंग राजपूतच्या सोबत दिसली होती. मुक्कू आणि मन्सूरची सुंदर प्रेमकहाणी आणि केदारनाथ आणि या ठिकाणाप्रती श्रद्धेने भरलेला हा चित्रपट आजही साराच्या हृदयाच्या जवळ आहे, म्हणूनच ती संधी मिळताच केदारनाथला निघून जाते.