मुंबई – हा पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा आहे. निवडणूकीतून त्याचे मोजमाप होणार आहे. आपण कुठे आहोत हे ठरणार आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष अजित पवार यांचा होता हे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे. परंतु ताकद अजून वाढवावी लागेल, असेही छगन भुजबळ म्हणाले. तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे आहे. याबाबत आता चर्चा रंगत आहे.
आज (18 जानेवारी) राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा निर्धार केला. सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्री शिक्षणाचा केला. तुम्हाला तेवढं मोठं होता येणार नाही. मात्र पाऊल तर टाकावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यासाठी सर्व समाजातील घटकाला घेऊन पुढे जावे लागेल, असेही स्पष्ट केले.
तुम्ही सर्वांसाठी काम करा असे म्हणत भुजबळ यांनी संत कबिरांचा दोहा ऐकवला. बुरा सोचना, बुरा देखना. लेकीन दिल मे खोजा तो बुरा ना कोय असे यातून स्पष्ट होते. त्यामुळे कुणाबद्दल वाईट बोलू नका, स्वतः ला तपासा, असे स्पष्ट केले. जिंदगी जिंदादाली का नाम है. मुर्दा दिली का नही. जो जिवंत आहे तो लढेल तुमचं दिलच मुर्दा बनेल असेल तर तुम्ही कसे लढणार. त्यामुळे तुम्ही लढत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.