काबूल – अफगाणिस्तानमध्ये बाॅम्बहल्ले सुरुच आहेत. आज (शुक्रवार) पुन्हा दक्षिण अफगाणिस्तानातील कंधारमध्ये एका मशिदीत बाॅम्बस्फोटाची घटना घडली. यात 32 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तालिबान प्रवक्ता बिलाल करीमी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कंधार प्रांतातील एका मशिदीला टार्गेट बनवून बाॅम्बस्फोट झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यापासून बाॅम्बस्फोटाच्या अनेक घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात देखील उत्तर भागात अशाच प्रकारचा बाॅम्बस्फोट झाला होता. शुक्रवारी नमाज पठणासाठी अनेकजण मशिदीत असतात. याचा फायदा घेत मशिदीवर बाॅम्बहल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मशिदीत सहसा शिया अल्पसंख्यांक समुदायाचे सदस्य येतात. त्यांना इस्लामिक स्टेट समूह निशाना बनवते. गेल्या आठवड्यात आईएसने उत्तर प्रांतात कुंदुज येथील एका शिया मशिदीतील आत्मघाती बाॅम्ब हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्या हल्यात 46 लोक मृत्यूमुखी पडले होते.