मुंबई- “बोलो जुबा केसरी…’ असं सतत बोलणाऱ्या अभिनेता ‘अजय देवगन’ला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अजय गेल्या अनेक वर्षांपासून एका नामांकित मसाला कंपनीच्या तंबाकू उत्पादकाची जाहिरात करत आहे. आणि याचवरुन आता अजय देवगनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
या संदर्भातील काही मिम्स देखील नेटकऱ्यांकडून व्हायरल करण्यात येत आहे. ‘अनेकांना तर अजयने ही जाहिरात केल्याने सर्वानी आक्षेप घेतला’ असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. यावर अजय म्हणाला, “ही वैयक्तिक निवड आहे. जेव्हा तुम्ही जाहिरात करता, तेव्हा तुम्ही पाहता की त्याने होणारे नुकसान किती आहे.
मी स्वत: साठी इतकचं बोलेन की मी वेलचीची जाहिरात करतो. मला मान्य आहे की प्रॉब्लम हा जाहिरातीत नाही, जर कोणती वस्तू इतकी वाईट आहे तर त्याची विक्री व्हायला नको.’ असं अजय म्हणाला.
अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या ‘रनवे -34’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. आणि याच प्रमोशन दरम्यान त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान, याच मसाला कंपनीच्या जाहिरातीवरून अभिनेता अक्षय कुमार ह्याला देखील सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी सुनावलं होत.