नवी दिल्ली : दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती. दरम्यान, हिंसाचार झालेल्या दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर पालिकेने आज सकाळपासूनच कारवाई सुरु केली आहे.
दिल्लीच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दंगलीतील आरोपींनी जहांगीरपुरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे उभी केल्याचा दावा करत यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली असून बुल्डोझरच्या सहाय्याने अनधिकृत दुकानं, घरं तोडली जात आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस तैनात करण्याची मागणी पालिकेने केली आहे.
#WATCH North Delhi Municipal Corporation conducts anti-encroachment drive in Jahangirpuri in Delhi
The civic body has asked for 400 personnel from Delhi Police to maintain the law & order situation during the drive in the area pic.twitter.com/KViPfwPEqr
— ANI (@ANI) April 20, 2022
सकाळी दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईआधी तेथील स्थितीचा आढावा घेतला. पोलिसांना लिहिलेल्या पत्रात, महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य आणि स्वच्छता विभाग आणि इतरांसोबत संयुक्तपणे जहांगीरपुरीमधील अतीक्रमणावर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.
#WATCH | Anti-encroachment drive underway at the Jahangirpuri area of Delhi which witnessed violence on April 16 during a religious procession pic.twitter.com/zIxMVccwSM
— ANI (@ANI) April 20, 2022
दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनीदेखील उत्तर पालिकेच्या आयुक्तांनी पत्र लिहीत जहांगीरपुरी येथील दंगलखोरांनी उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेत त्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.