तळेगाव ढमढेरे – पुणे जिल्हा दूध संघावर 30 वर्षे अविरत असलेले व सलग सहा वेळा संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचे चिरंजीव ऍड. स्वप्नील ढमढेरे यांनी अ गटातून निवडणूक लढवीत एकूण 168 मतांपैकी 132 मते मिळवून प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. निवडीनंतर ऍड. स्वप्नील ढमढेरे व केशर पवार यांचा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, शिरूर खरेदी विक्री माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, सदाशिव पवार, खरेदी विक्री संचालक संभाजी भुजबळ, माजी सरपंच सुजाता नरवडे, तळेगाव ढमढेरे माजी उपसरपंच विजूपाटील ढमढेरे, सोसायटीचे अध्यक्ष अविनाश ढमढेरे, काका जेधे, उमेश भुजबळ, ऍड. संपत ढमढेरे उपस्थित होते.