बंगळुरू – कर्नाटकातील लोकसभेच्या एकूण २८ पैकी २० जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले. त्यामुळे त्या पक्षाने ९ विद्यमान खासदारांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले. भाजपने तिकीट नाकारलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचा मतदारसंघ बदलण्यात आला. त्यांना उडुपी-चिकमगळूर ऐवजी गौडा यांच्या जागी बंगळुरू उत्तरमधून उमेदवारी देण्यात आली. मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) भाजपने कर्नाटकमधील तब्बल २५ जागा जिंकल्या होत्या.
त्यावेळी त्या पक्षाने जेडीएसशी युती केली आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस किती जागा लढवणार ते अद्याप समोर आलेले नाही.