ब्रुसेल्स – युरोपीय संघाने युक्रेन युद्धाच्या अनुषंगाने रशियावर अतिरिक्त निर्बंध घातले. युरोपीय संघाने यापूर्वीच रशियाच्या सोन्याच्या आयातीवर बंदी घातली आहे. तसेच उच्च तंत्रज्ञानाच्या काही वस्तूंच्या निर्यातीवरही निर्बंध घातले आहेत. युरोपीय संघाच्या बहुतेक सर्व सदस्य देशांनी या निर्बंधांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज नव्याने निर्बंध जाहीर करण्यात आले.
युरोपीय संघाचे निर्बंध दीर्घकालीन असतील, असे युरोपीय आयोगाच्या प्रमुख उर्सुला वोन डेर लेयन यांनी म्हटले आहे. या दीर्घकालीन निर्बंधांमुळे रशियाला एक कठोर संदेश दिला जाईल. जितका काळ रशियावर दबाव आणता येईल तितका अधिक काळ हे निर्बंध कायम ठेवले जातील, असे त्या म्हणाल्या.
Monkeypox | मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14 हजार रुग्ण तर ‘या’ देशात 5 जणांचा मृत्यू
या निर्बंधांसाठी युरोपीय संघाने जी-7 गटातील देशांशी सहकार्य केले असल्याचे युरोपीय संघाचे अध्यक्षपद असलेल्या चेक प्रजासत्ताकने म्हटले आहे. या निर्बंधांचे स्वरुप जाहीर करण्यात आलेले नाही. सर्व सदस्य देशांकडून कोणतीही हरकत आली नाही, तरच हे निर्बंध जाहीर केले जाणार आहेत. या निर्बंधांव्यतिरिक्त युरोपीय संघाने युक्रेनला 500 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत देण्याचाही निर्णय घेतला आहे.