दैनिक प्रभात, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या उपक्रमाचे कौतूक
नगर -दैनिक प्रभात, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे सोमवारी (ता. 14) नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रासह शेजारील गोवा, कर्नाटक आदी राज्यांमधूनही स्पर्धकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे, उद्योजक अनिल वाबळे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, नाभिक महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विकास मदने, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई येथील वॉल इंडिया ग्रुमिंग प्रॉडक्ट, नगरमधील माय केअर, प्रशांत कॉस्मेटिक, बापू एजन्सीज, समीर कॉस्मेटिक, समर्थ कॉस्मेटिक, जय बाबा कॉस्मेटिक या दालनांतर्फे स्पर्धेचे प्रायोजकत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेसाठी 45 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास 11 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच तृतीय क्रमांकास साडेसात हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी स्पर्धक व उपस्थित राहणाऱ्या नाभिक व्यावसायिकांमधूनही दहा भाग्यवंतांची निवड करण्यात येईल. त्यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित असलेल्यांनाच ही बक्षिसे मिळतील, अशी माहिती संयोजकांनी दिली. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा स्पर्धा संपल्यानंतर पुढील अर्ध्या तासानंतर सुरू होईल. नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. तपोवन रस्त्यावरील तपोवन मंदिरासमोर असलेल्या श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: अध्यक्ष, जनार्धन वाघ:9850560328, अजय कदम: 8308350084, किशोर मोरे: 9503717751.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय मदने, शरद दळवी, दिलीप शिंदे, विशाल मदने, मनोज शिंदे, नीलेश शिंदे, सुनील खंडागळे, सुनील जाधव, बापू क्षीरसागर, संजय भुजबळ, सदाभाऊ शिंदे, बबन मदने, चंदू बिडवे, दत्ता कदम, अशोक खामकर, नवनाथ मदने, भाऊसाहेब काळे, अनिल कदम, शहाजी कदम, शिवाजी दळवी, विनोद साळुंके, महेंद्र जाधव, अरुण वाघ, सिद्धांत झेंडे, अमित वाघमारे, जगन्नाथ झेंडे, अभिषेक खामकर, सुनील शिंदे, गणेश कदम, विठ्ठल वाघमारे, सत्तार अली शेख, इम्रान शेख, सुदर्शन कोंडूर, अनुप राऊत, प्रमोद शेजूळ, अनिल राऊत , सुनील सैदाणे आदी प्रयत्नशील आहेत.