loksabha election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, जे पी नड्डा, नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्यासह शिवसेनेचे मंत्री या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
या यादीत शिवसेनेच्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंच नावं नसल्यामुळे आता विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून शिंदे गटावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेता, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे
वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात.
बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख… pic.twitter.com/BX9ptSveU2— Ambadas Danve (@iambadasdanve) March 28, 2024
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,
-पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे,
-शिवसेना नेते रामदास कदम,
-शिवसेना नेते गजानन किर्तीकर,
-शिवसेना नेते आनंदराव अडसूळ,
-भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
-खासदार प्रफुल्ल पटेल,
-खासदार मिलिंद देवरा,
-मंत्री गुलाबराव पाटील,
-शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे,
-शिवसेना नेत्या मीना कांबळी,
-खासदार श्रीकांत शिंदे,
-मंत्री उदय सामंत,
-मंत्री शंभुराज देसाई,
-मंत्री दिपक केसरकर,
-मंत्री अब्दुल सत्तार,
-मंत्री तानाजी सावंत,
-मंत्री संदीपान भुमरे,
-मंत्री दादाजी भुसे,
-मंत्री संजय राठोड,
-आमदार भारत गोगावले