अभिनेत्री सनी लिओनी आणि उर्वशी रौतेला नंतर आता पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगल सुद्धा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सोनलीने फोटोशूटसाठी चांगला पर्याय शोधला आहे. सोनालीने चक्क तिच्या किचनमध्येच फोटोशूट केले आहे.
सोनालीने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने हे फोटोशूट तिने तिच्याच किचनमध्ये केल्याच सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सोनाली ब्लॅक आणि रेड आउटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिनं व्हाइट स्निकर्स घातले आहेत.
घरातल्या किचनमध्ये करण्यात आलेल्या सोनालीच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यामध्ये ती किचनच्या कॅबिनेटवर बसून पोझ देताना दिसत आहे. बाकी सेलिब्रेटींप्रमाणे सोनाली सुद्धा सध्या केरोना व्हायरसमुळे होम क्वारंटाईन आहे. मात्र ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. करोना व्हायरसमुळे सध्या बऱ्याच कलाकारांच्या सिनेमांचे शूटिंग थांबले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार घरी आहेत. त्यामुळे ते चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.