मुंबई – अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य हे घटस्फोटानंतर देखील चांगलेच चर्चेत असतात. नागा चैतन्य हा त्याच्या अफेअरमुळे चर्चेत असतो तर समंथा आगामी प्रोजेक्टमुळे. हे दोन्हही बडे स्टार विभक्त झाल्यामुळे फॅन्सला आजही आश्चर्य वाटत. आता चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडले जात आहे.नुकतेच या दोघांच्या डिनर डेटचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता समंथाने देखील यावर भाष्य केले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान समंथा म्हणाली की, कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची तिला पर्वा नाही. ती म्हणाली, ज्यांना प्रेमाची किंमत कळत नाही, त्यांनी कितीही लोकांना डेट केले तरी त्यांच्या डोळ्यात अश्रूच येतील.जर त्याने आपले वागणे बदलले आणि मुलीला न दुखावता काळजी घेतली तर ते सर्वांचे चांगले होईल असं समंथा यावेळी म्हणाली.
समंथा आणि नागा चैतन्य ही साऊथमधील एक फेमस कपल होत. फॅन्सने तर या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं होत त्यामुळे यांचं रिलेशन तुटल्यापासून अनेक फॅन्स देखील नाराज झाले होते. आजही चैतन्यच्या अफेअरबाबत बातम्या आल्यावर अनेकजण सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना दिसतात.
2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. चार वर्षांनंतर, 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता समंथा रुथ प्रभू तिचा आगामी चित्रपट ‘शकुंतलम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती वरुण धवन अभिनीत ‘सिटाडेल’चा एक भाग आहे.