मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री ‘मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. मौनी रॉय तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतंच मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूपच मादक दिसत आहे. फोटोंमध्ये मौनी रॉयने तिच्या पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर फोटो पोस्ट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मौनी रॉय बाल्कनीमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले.. ‘तिने आयुष्यावर प्रेम केलं आणि आयुष्यानं तिच्यावर प्रेम केलं’. असं कॅप्शन तिने या फोटोंना दिल आहे.
दरम्यान, मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून, काही दिवसांपूर्वी मौनी तिच्या बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार’सोबत विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यात मौनी रॉय आणि सूरज नाम्बियारचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होत.