मुंबई : काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अंकिता-विकी यांचा विवाह मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये अतिशय राजेशाही थाटात पार पडला.
View this post on Instagram
या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष रित्या शुभेच्छा दिल्या. आता अंकिताचा नवराही तिच्याबरोबर अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. विकी लवकरच कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना दिसणार आहे.
याबाबतची संपूर्ण माहिती या जोडप्याने सोशल पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांनी शोचा प्रोमो शेअर केला आहे. स्टार प्लसवरील आगामी शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये विकी अंकितासोबत दिसणार आहे. अंकिताने पतीचे अभिनयविश्वात स्वागत केले आहे.
सोशलवरील पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की,’मला वाटलं या जगात माझ्या टाईपची मी एकटीच आहे. परंतु सुदैवाने मला माझ्यासारखाच वेडेपणा करणारा कुणीतरी भेटला. आमच्या आवडी-निवडीसुद्धा सारख्याच आहे. आवडतं डेस्टिनेशन ‘घर’. त्यांनतर विकी पुढे म्हणतो, मला रोमँटिक चित्रपट खूप आवडतात. तर अंकिता म्हणते मला रोमान्स करायला आवडतो. विकी म्हणतो वाटलं नव्हतं सात वर्षांची सोबत साता जन्मात रूपांतरित होईल. अंकिता म्हणते पसंत नेहमीच मिळते असं नाही परंतु प्रेमळ नात्यासाठी हा मध्ये हा करते’.