मुंबई – अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 12 ऑगस्टला सायंकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अंकिताचे तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते. अनेकदा वडिलांसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच फादर्स डेनिमित्त तिने तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली होती. काही फोटो शेअर करत अंकिताने लिहिले होते की, “माझे पहिले हिरो माझे वडील आहेत. मला तुमच्याबद्दल जे वाटते त्या भावना मी नीट व्यक्त करू शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. बाबा, मी तुम्हाला अनेक गोष्टींसाठी संघर्ष करताना पाहिले आहे. मी लहान असतानाही तुमचा संघर्ष पाहत होते. पण तुम्ही तुमच्या मुलांना कधीही संघर्ष करू दिला नाही. तुम्ही आम्हाला सर्व काही दिले आहे. जेणेकरून मला आयुष्यात जे काही करायचे आहे ते मी करू शकेन.”
View this post on Instagram
दरम्यान, अंकिताचे वडील व्यवसायाने बँकर होते. अंकिताच्या वडिलांचा मृतदेह त्यांच्या इंटरफेस अपार्टमेंटमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (13 ऑगस्ट, रविवार) सकाळी 11 वाजता ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.