मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील आयकॉनिक “हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात. सोशल मीडियावर देखील या चित्रपटातील अनेक व्हिडिओ आजही व्हायरल होतात. या चित्रपटात सनी देओलसह अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसून आली होती.
दरम्यान, आता या चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर-2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर या चित्रपटाचं एक अधिकृत पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं होत. हा चित्रपट याचवर्षी स्वातंत्र्यदिनी रिलीजसाठी मोठ्या जल्लोषात तयार आहे.
मात्र, अश्यातच या चित्रपटाच्या चाहत्यांना एक प्रश्न पडला असून, या प्रश्नाचे आता उत्तर देखील समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटात अमीषा पटेल म्हणजे सकीनाच्या वडीलांची भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न सिनेरसिक विचारत होते. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
‘गदर-2’ या चित्रपटात सकीनाच्या वडीलांची भूमिका अभिनेता ‘मनीष वाधवा’ साकारणार आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपट मनीष वाधवा खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. आता ते ‘गदर-2’ चित्रपटात अमिषाच्या वडीलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर’ सिनेमात अमिषाच्या वडीलांची भूमिका दिग्ज अभिनेते ‘अमरिश पूरी’ यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं होत.