बलात्कराच्या आरोपाखाली अभिनेता करण ओबेरॉयला अटक

मुंबई – टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय याच्याविरोधात एका महिला ज्योतिषाने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. सदर महिलेने अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर २०१६ पासून लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा तसेच आपले अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी सांगितले की, “सदर महिलेच्या तक्रारीवरून करण ओबेरॉय याला काल (रविवारी) अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या ३७६ (बलात्कार) व ३८४(खंडणी) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

करण ओबेरॉय याला आज न्यायालयामध्ये सादर केले असता न्यायालयाने त्याला ९मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करण ओबेरॉय हा छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याने ‘जस्सी जैसी कोई नहि’, ‘इनसाइड एज’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.