मुंबई – अभिनेता अक्षय कुमार प्रत्येक वर्षी किमान चार तरी चित्रपट करतोच. ओटीटी असो वा थिएटर अक्षयचा बोलबाला सगळीकडे पाहायला मिळतो. एव्हढेच नाही तर जाहिरातींच्या बाबतीतही अक्षय कुमार बड्या स्टार्सना मागे टाकताना दिसतो. टीव्हीसाठी बड्या जाहिराती करणे असो वा आपल्या सोशल मीडियावर प्रमोशन करणे असो, खिलाडी कुमार सतत व्यस्त असतो. मात्र सध्या अशाच एका प्रमोशनल जाहिरातीमुळे अक्षय कुमार ट्रोल झाल्याचे पाहायला मिळते.
Ye kya hai saram karle India ko bi nahi chhoda Canadian kumar 😡😡 pic.twitter.com/3DWreQt978
— Rashmita Ram (@RamRashmita) February 5, 2023
अक्षयने आपल्या सोशल मीडियावर ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यामध्ये अक्षयसोबत मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा व नोरा फतेही देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे सर्व स्टार्स एका ऍनिमेटेड पृथ्वीवरून चालताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी यावावरूनच अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमारने प्रमोशनसाठी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अक्षय थेट भारताच्या नकाशावरून चालतोय असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. थोडी तरी रिस्पेक्ट करायची.. हा आमचा भारत आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘हे काय आहे.. लाज वाटू दे भारताला देखील नाही सोडले कॅनडा कुमार’ असं म्हणत एका युजरने अक्षयला चांगलेच सुनावले आहे.