“अस्वच्छ’ प्लॉट मालकांवर होणार कारवाई : वाकळे

विद्यानगर परिसराची पाहणी : ड्रेनेजचे काम होणार सोमवारपासून सुरू

नगर – नगर कल्याण रोडवरील प्रभाग क्र.17 विद्यानगर परीसरात ड्रनेज लाईनचे काम करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या असून प्रत्यक्ष काम सोमवार पासून सुरु होणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. तसेच ज्या नागरिकांचे मोकळे प्लॉट आहेत. तेथे अस्वच्छता आहे.

अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जागा स्वच्छ करण्यासंदर्भात सूचना देणार आहोत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विद्या कॉलनी मध्ये मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याची पाहणी करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शनिवार (दि.27) रोजी विद्या कॉलनी परिसराला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

महानगरपालिका प्रभाग क्र 17 विद्या कॉलनी व आठ परीसरामध्ये नागरिकांनी जागा घेऊन ठेवल्या. या जागेची कुठलीही स्वच्छता नसल्यामुळे येथे पावसाचे पाणी साचत असून परिसरात गवत वाढले आहे. या पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. या भागात ड्रेनेज लाईन नसल्यामुळे पाणी जाण्यासाठी जागा नाही. याबाबत नागरिकांनी महापौर वाकळे यांच्या कडे तक्रारी केल्या. वाकळे यांनी महापालीकेचे अधिकारी यांनी या कामाचे अंदाज पत्रक तयार करण्यास सांगितले असून सोमवारपासून प्रतक्ष कामाला सुरवात करण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांनी येथे गुंठेवारी घेऊन जागा घेतलेली आहे. त्या जागेत अस्वच्छता आहे अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जागा स्वच्छ करण्यासंदर्भात सूचना देणार आहोत. जर कुणी दिरंगाई तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी पारूनाथ ढोकळे, अभय शेंडगे, प्रा. खासेराव शितोळे, दत्ता गाडळकर, सचिन शिंदे, लालचंद हराळ, भाऊसाहेब थोटे, अमित ताकटे, एकनाथ व्यवहारेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)