सोनाळवाडी चारा छावणी चालकांविरोधात गुन्हा

नगर – कर्जत तालुक्‍यातील सोनाळवाडी येथील चारा छावणीचालका विरोधात शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष सुधीर दादासाहेब तोडकर, उपाध्यक्ष सुनील दत्तात्रय तोडकर, खजिनदार सुवर्णा रमेश तोडकर, सदस्य अशोक चंद्रभान तोडकर (सर्व रा. तोडकरवाडी, ता.कर्जत), सचिव तुषार मोहन काशीद (रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत), पुष्पा दादासाहेब तोडकर अनिल बाबा खेडकर (रा. चिलवडी, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी येथील चारा छावणीत महसूलच्या पथकाने अचानक तपासनी केली. या तपासणीत चारा छावणीत नियम व अटींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यावरून तलाठी प्रशांत गोंडचोर यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)