मोटार वाहन सुधारणा विधेयकानुसार यापुढे भरावा लागणार ‘एवढा’ दंड

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-2019 सादर केले. रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी यावेळी केले आहे. गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो आहेत. त्यामुळे या विभागाची जबाबदारी माझी असून मी ती स्वीकारत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना गडकरी यांनी लोकांना दंडाचा धाक उरलेला नाही अशी प्रस्तावना करत वाहतूक दंडांच्या रकमेत जबर वाढ प्रस्तावित केली. लोकसभेत हे विधेयक नव्याने मांडण्यात आले असून विधेयक पारित करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

मोटार वाहन सुधारणा विधेयकानुसार कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसेल तर सध्याचा 100 रुपये दंड थेट 1000 रुपये करण्यात आला आहे. अतिवेगाने गाडी चालवाल तर सध्याच्या 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड भरावा लागेल. वाहतुकीच्या वेळेत तुम्ही रुग्णवाहिकेला जाण्यास जागा दिली नाही तर 10000 रुपयांचा दंड तर यापुढे ड्रायव्हींग लायसन्ससाठी आधार नंबर सक्तीचा करण्यात येईल. अशा अनेक दंडात्मक कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आल्या आहेत. याआधी हे विधेयक 2017 मध्ये लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. मात्र, राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. या विधेयकात अनेक शिफारसी असून नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईची शिफारस आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)