Accident: अहमदनगर-कल्याण महामार्गावर पिकअप-हायवाची समोरासमोर धडक; एक ठार

बेल्हे – अहमदनगर-कल्याण महामार्गावर बेल्हे (ता. जुन्नर) येथील बाह्यवळण चौकात पिकअप व हायवा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि. 19) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात हायवा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल गोपीनाथ रायकर (वय 35 रा. पारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे जागीच मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर हायवा ट्रकचालक गाडी सोडून पसार झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, आळेफाटाकडून पारनेरकडे जाणारा राख भरलेला हायवा ट्रक (एमएच 15 जीव्ही 3660) हा पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी बेल्हे गावाजवळ असलेल्या बाह्यवळण चौकातून पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी वळत असतानाच नगरकडून आळेफाट्याकडे जाणाऱ्या पिकअपची (एमएच 16 सीसी 6919) आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.