मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, डॉ. केतन खुर्जेकरांसह चालक ठार

पुणे – मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री ओझर्डे गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी होती की मध्यरात्री २ किलोमीटर पर्यंत अपघाताचा आवाज गेला. खासगी बसने कारला मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मृतांमध्ये एका डॉक्टरांचा समावेश असून डॉ. केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. या अपघातात डॉ. खुर्जेकर यांचे चालक ज्ञानेश्वर भोसले यांचाही मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे जयेश पवार आणि प्रमोद भिलारे अशी आहेत.

केतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील अस्थीरोग तज्ज्ञ होते. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला हे सगळे गेले होते. कार्यक्रम आटोपून माघारी येताना डॉ. केतन खुर्जेकर यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी ते आपल्या चालकाला मदत करत होते, त्याचवेळेस खासगी बसने दोघांनाही उडवल. आज डॉ. केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता, अशी माहिती खुर्जेकर यांचे मामेबंधू पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली आहे. या अपघाताचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे. यामध्ये कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)