ज्याच्याकडे संयम नाही, त्याचा हा मार्ग नव्हे! (भाग-2)

ज्याच्याकडे संयम नाही, त्याचा हा मार्ग नव्हे! (भाग-1)

सिद्धांतशी चर्चा केल्यावर मला समजलं की, त्याची गुंतवणूक ही त्याच्या पॉकेटमनी मधून होणार होती आणि ‘त्याचा’ शेअर बाजाराबद्दलचा दृष्टीकोन ठाम होता की संपूर्ण पैसे देखील बुडू शकतात अथवा दीर्घ मुदतीत अनेकपट होऊ शकतात. याउलट बऱ्यापैकी इतरत्रगुंतवणुकीचा अनुभव असणारे अमितकुमार यांच्या बाजारापासून रास्त अपेक्षा होत्या व त्यामुळं ते आपल्या गुंतवणूकीचं जास्त अवमूल्यांकन करून घेण्यास तयार नव्हते, अर्थातच त्यामागं त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ध्येयं, उद्दिष्टं इ. गोष्टी देखील समाविष्ट होत्या, ज्या सिद्धांतच्या बाबतीत नव्हत्या. दोन्हीपैकी कोणाचही मत बरोबर किंवा चुकीचं नाही, परंतु ते दोघंही त्यांच्या स्वतःच्या पूर्व-गृहीत संकल्पनेसहयेतात किंवा ज्याला आपण त्यांचे पूर्वग्रह म्हणू शकतो जे त्यांच्या गुंतवणूक प्रवृत्तीवर प्रभाव टाकत असतात. अजून एक प्रकारच्या मानसिकतेबद्दल लिहावंसं वाटतं. श्री. शहा, वय ४७ वडिलोपार्जित कोणतीही प्रॉपर्टी नसताना व इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसताना गेली २२ वर्षं शेअरबाजार हीच रोजीरोटी समजून त्याप्रकारे गुंतवणूक करत आहेत व त्यातून आपला संसार यशस्वीरीत्या चालवत आहेत. याउलट, अनेकजण म्युच्युअल फंडातील केलेल्या गुंतवणुकीतून (खासकरून मिडकॅप्स व स्मॉलकॅप्स योजना) अपेक्षित परतावा न मिळाल्यानं (लाखाचे बारा हजार होण्याचं भय बळावल्यानं) संपूर्ण गुंतवणूक नुकसान सोसत काढून घेण्याबद्दल सल्ला घेण्यासाठी येतात. यात एकतर त्यांच्या अपेक्षा या त्यांनीच मागील परतावा पाहून सेट केलेल्या असतात व गेल्या वर्षभरातील परिस्थिती पाहून अशा योजनांचं भवितव्य देखील तेच ठरवत असतात. अशा परिस्थितीत संयम हाच सल्ला असू शकतो.

गुंतवणूकीआधी ज्या प्रकारात आपण गुंतवणूक करत आहोत ती गुंतवणूक मी झुंडप्रवृत्तीनं (हर्ड मेंटॅलिटी) करत आहे का ? कोणत्या मोहात पडून फाजील अपेक्षेनं करत आहे का ? असे प्रश्न स्वतःलाच विचारून त्याजबरोबरीनं अशी गुंतवणूक करताना त्यातील जोखीम, परतावा, इतर पर्यायांमधील संधी, या गुंतवणुकीमागील आपली ध्येयं, उद्दिष्टं इ. सर्व गोष्टीचा सारासार विचार करूनच निर्णय घेण्यात शहाणपण आहे.त्यामुळं, ‘Your biases change your behavior’ हेच खरं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)