नवी दिल्ली – टीएमसीची राज्य सचिव आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री “संयतिका बॅनर्जी’चा कार अपघात झाला आहे. या अपघातात संयतिका गंभीर जखमी झाली असून, तिला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
गुरुवारी संयतिका बांकुडाहून कोलकत्ताला जाण्यास निघाली होती. त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये संयतिकाच्या कारचा जागीच चुराडा झाला. मात्र, आता ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
View this post on Instagram
सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असून, केवळ अपघात आहे की कुणी कट रचला होता याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. संयतिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा अपघात झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.