मुंबई – सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. तर दुसरीकडे काही कट्टरपंथी लोकांनी बिपिन रावत यांच्या निधनानंतर आनंद व्यक्त केला आहे. यादरम्यान या लोकांनी सीडीएस रावत यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. यावरून केरळमधील मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शक अली अकबर यांनी याबाबत निषेध व्यक्त केला असून मुस्लिम धर्म सोडण्याची घोषणा केली आहे.
अकबरने बिपिन रावत यांच्या हौतात्म्यावरुन एक फेसबुक लाइव्ह केले होते. ज्यावर काही धर्मांधांनी हसणारे इमोजी टाकले होते. यावरून अली अकबर यांच्या भावना दुखावल्या आहेत. फेसबुक लाईव्हवर येऊन त्यांनी याबाबत चर्चा केली. बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना अली अकबर म्हणाले की, “हे कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच मी माझा धर्म सोडत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. अकबर यांनी या फेसबुक लाइफमध्ये बिपिन रावत यांच्यासाठी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या मुस्लिम युजर्सलाही फटकारले.
ते म्हणाले, आता धर्मावरील विश्वास उडाला आहे. आज मी जन्मापासून मिळालेले कापड फेकून देत आहे. आतापासून मी मुस्लिम नाही. मी फक्त भारताचा नागरिक आहे.