लेह – लडाखमधील लेहजवळ लष्कराच्या ट्रकला अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि सात जवान शहीद झाले. शनिवारी सायंकाळी कियारी परिसरात हा अपघात झाला.
लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या ट्रकसोबत एक रुग्णवाहिका आणि यूएसव्ही होती. या सर्व वाहनांमध्ये लष्कराचे एकूण 34 जवान होते. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. लडाखमधील संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर झाला. लष्कराचे वाहन दरीत कोसळले. हे जवान कारू गॅरिसन येथून लेहजवळील कियारीकडे जात होते. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून ते बचावकार्यात सुरु आहे. या दुर्घटनेत काही जवान जखमीही झाले आहेत.
Ladakh | Seven Indian Army soldiers lost their lives in an accident 7 km short of Kyari town when their vehicle fell in a gorge. Many others are injured in the incident. The troops were moving from Karu garrison to Kyari near Leh. Many troops have suffered injuries also in the… pic.twitter.com/lAABfH5Zav
— ANI (@ANI) August 19, 2023