मुंबई- शिवसेने नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
किरीट सोमय्या, मेधा सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलिसांत एफआयआर अर्ज दाखल केला आहे. एका वर्तमानपत्रामध्ये आपल्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले, असा आरोप मेधा सोमय्या यांनी केला आहे. सोबत त्यांचे वकील तसेच भाजपाचे कार्यकर्तेदेखील होते.
दरम्यन, शिवसेना आणि भाजपाचे वाद पाहता यावेळी पोलीस खबरदारी घेताना दिसून आले. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपात वाक् युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता सर्व कुटुंबासह सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.