तब्ब्ल २८ दिवसानंतर लतादीदी घरी परतल्या

स्वतः लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई – गानसाम्राज्ञी लता मंगेशकर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. आज दीदींना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्या आता घरी परतल्या आहेत. स्वतः लता मंगेशकर यांनी आपल्या अधीकृत ट्विटरवरून ही माहिती दिली. शिवाय सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

लतादीदींनी ट्विट मध्ये म्हंटल कि,  “नमस्कार… गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. मी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम व प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडी रुग्णायातील डॉक्टर खरच देवदूत आहे. आणि सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा’. असं दीदींनी म्हंटल आहे.

लतादीदींना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली  दीदींवर उपचार सुरू होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्‍वगायिका असणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.