‘या’ पाक खेळाडूचे १० वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन

इस्लामाबाद : पाकिस्तानने श्रीलंकेविरूध्द कसोटी मालिकेसाठी दहा वर्षानंतर पहिल्यांदा ३४ वर्षीय मधल्या फळीतील फलंदाज फवाद आलम याला संघात स्थान दिले आहे. मुख्य निवडकर्ते आणि मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक यांनी शनिवारी स्थानिक क्रिकेटमधील अलीकडच्या शानदार कामगिरीमुळे या डावखु-या फलंदाजाची निवड केली आहे.

श्रीलंकेविरूध्दची ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सहभाग आहे. पहिल्या कसोटीस ११ डिसेंबरपासून रावलपिंडीमध्ये सुरूवात होणार आहे, तर दुसरी कसोटी १९ ते २३ डिसेंबर दरम्यान कराचीत होईल.

आलम याने मागील कसोटी सामना २००९ मध्ये न्यूझीलंडविरूध्द खेळला होता. त्याने जुलै २००९ मध्ये पदार्पणाच्या कसोटीतच शतक ठोकले होते. नुकत्याच झालेल्या आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेत पाकला २-० ने पराभवला सामोरे जावे लागले होते. या कसोटी मालिकेतील १६ सदस्याच्या संघात पाकने २ बदल केले आहेत. ज्यामध्ये आलमला इफ्तिखार अहमद ऐवजी तर उस्मान शिनवारीला मोहम्मद मूसाऐवजी संघात स्थान देण्यात आलं आहे.

पाकिस्तान संघ : अजहर अली (कर्णधार), आबिद अली, असद शफीक, बाबर आजम, फवाद आलम, हैरिस सोहेल, इमाम उल हक, इमरान खान, काशिफ भाटी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, शाहीन अफरीदी, शान मसूद, यासिर शाह आणि उस्मान शिनवारी.

Leave A Reply

Your email address will not be published.