काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चनच्या हाताला दुखापत झाली होती, पण ही विशेष बाब नाही. हातावरची सर्जरी झाल्यानंतर तो लगेचच कामाला रूजू झाला आहे.
ही त्याच्याबाबतची खास बात आहे. अभिषेक बच्चनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्या हातावर बॅन्डेज बांधलेले दिसते आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने “मर्द को दर्द नहीं होता.’ असे म्हटले आहे.
आपल्या फॅन्सनी आपल्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी त्याने सर्वांना धन्यवाददेखील दिले आहेत. गेल्या बुधवारी चेन्नईमध्ये आपल्या एका आगामी सिनेमाच्या सेटवर हाताला दुखापत झाल्यावर त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्याच्या हातावर लगेच सर्जरी करणे आवश्यक होते.
त्यामुळे चेन्नईवरून त्याला मुंबईला आणले गेले. लिलावती हॉस्पिटलमध्ये सर्जरी झाल्यावर तो लगेचच आपल्या शूटिंगसाठी पुन्हा चेन्नईला रवाना झाला आहे. “शो मस्ट गो ऑन’ असेही तो म्हणाला. पप्पा म्हणतात त्याप्रमाणे “मर्द को दर्द नहीं होता.’ असेही त्याने म्हटले आहे. मात्र, त्याला दुखापत नक्की कशी झाली हे समजू शकलेले नाही.