ग्वाल्हेर – इराणी करंडक लढतीच्या दुसऱ्या दिवशी शेष भारत संघाने सामन्यावर पकड मिळवली आहे. त्यांनी पहिल्या डावात 484 धावांचा डोंगर उभारला असून, दुसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशची 3 बाद 112 अशी बिकट स्थिती केली आहे.
Stumps on Day 2 of the #MPvROI clash in the @mastercardindia #IraniCup!
Yash Dubey (53*) and Harsh Gawli (47*) lead Madhya Pradesh’s fightback.
MP 112/3 in 1st innings, trail Rest of India by 372 runs.
Scorecard 👉 https://t.co/L1ydPUYfGj pic.twitter.com/o8uE0HFFIA
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 2, 2023
यशस्वी जयस्वाल द्विशतक व अभिमन्यू ईश्वरन याने दीडशतक फटकावल्यावर बाद होऊन परतल्यावरही त्यांच्या यश धौलने 55 धावांची खेळी करत तळातील फलंदाजांच्या साथीत संघाला साडेचारशे धावांपेक्षाही जास्त मजल मारून दिली. मध्य प्रदेशकडून आवेश खानने 4 बळी मिळवले. अनुभव आग्रवाल व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मध्य प्रदेशच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या 15 असतानाच त्यांचे 3 फलंदाज बाद होऊन परतले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यश दुबेने अर्धशतकी खेळी केली असून हर्ष गवळी 47 धावांवर खेळत आहे.
#INDvAUS 3rd Test Day 2 : भारतीय संघावर पराभवाचं सावट; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या…
या जोडीने दिवसअखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही व संघाचे शतक फलकावर लावले. शेष भारत संघाकडून नवदीप सैनीने 2 तर मुकेश कुमारने 1 गडी बाद केला. मध्य प्रदेशचा संघ आता 372 धावांच्या पिछाडीवर आहे.