पुणे – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी महिलेने अपहरण करुन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर चतृश्रुंगी पोलीस ठाण्यात खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे सदस्य मनिष आनंद यांच्यासह पाच जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षवर्धन जाधव व त्यांची सहकारी महिला यांच्याविरुध्द 14 डिसेंबर 2020 मध्ये एका ज्येष्ठ दांम्पत्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होता. यामध्ये फिर्याद ज्येष्ठ दांम्पत्याच्या मुलाने दिली होती. या कुटूंबाला सध्याच्या गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे.
अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, मजय चड्डा (सर्व रा. बोपोडी) आणी मनिष आनंद (खडकी बाजार) अशी आरोपींची नावे आहेत. मानकर चौक वाकड येथी रहाणाऱ्या 37 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार तीने 14 डिसेंबर 2020 रोजी औंध चौकात गाडी पार्क केली होती. यावेळी करण व ममता चड्डा यांनी पाठिमागून जाणून बुजून आरडा ओरडा करुन तीच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरले. आणि छातीला पकडून थोबडीत मारली.
यानंतर सहकारी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत औंध चौकात गेले असता, आरोपींनी गाडी अडवून गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. तेथे हर्षवर्धन जाधव यांना गाडीतून खाली खेचत शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या डोक्यात रॉड व काठीने मारा असे म्हणून अनोळखी व्यक्ती गर्दीतून तेथे आल्या. यानंतर आपणास जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले.
यानंतर कारमध्ये अमन, करण व मनिष यांनी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करुन रॉड व काठीने मारहाण केली. यानंतर आयफोन फोडून गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दादा जाधव करत आहेत. या गुन्ह्यात एकून आठ आरोपींचा समावेश आहे.