धर्मांतर करुन मुस्लिम तरुणाशी लग्न लावल्याचा कुटुंबियांचा आरोप
नवी दिल्ली : पाकिस्तानात शीख धर्मगुरुंच्या मुलीच अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करुन मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पाकिस्तानील शीख समुदायात प्रचंड रोष असून संताप व्यक्त केला जात आहे. भगवान सिंह असे मुलीच्या वडिलांचे नाव असून मोहम्मद एहसान या तरुणाशी जबरदस्ती तिचे लग्न लावल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी पाकिस्तानमधील सिंध आणि खायबर-पख्तूनवा प्रांतातून हिंदू आणि शीख तरुणींचे अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यात आता या घटनेची भर पडली आहे.
Sikhs of Pakistan seek help from @ImranKhanPTI
I urge @narendramodi Ji & @DrSJaishankar Ji to raise this issue at global level bcos forced conversions happening in Pakistan have angered all the Sikhs
This issue must be taken up at @UN as it threatens Sikhs freedom of religion pic.twitter.com/lsDsKg4ZHZ
— Manjinder S Sirsa (@mssirsa) August 29, 2019
मुलीच्या कुटुंबीयांनी सोशलमीडियावर व्हिडीओ अपलोड करत घटनेची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही मदत मागितली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा मुद्दा जागतिक स्तरावर नेला जावा अशी विनंती केली आहे. धर्मांतर केले तर तुझ्या कुटुंबीयांना गोळ्या घालून हत्या करु अशी धमकी तिला देण्यात आली होती असा दावा त्यांनी व्हिडीओत केला आहे. दरम्यान, मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओत मुलगी डोक्यावर काळा दुपट्टा घेऊन मोहम्मद एहसानच्या शेजारी बसलेली दिसत आहे. मुलगी आपण स्वत:च्या इच्छेने निकाह करत असल्याचे व्हिडीओत सांगत आहे. आपण 19 वर्षाचे असून, वडिलांच्या घरातून कोणतेही दागिने किंवा संपत्तीची कागदपत्रे आणली नसल्याचे मुलगी व्हिडीओत सांगत आहे.