महिलेची छेड काढणाऱ्यास दामिनी पथकाचा धडा
पुणे,दि.30- दामिनी पथकाला समाज कल्याण विभाग येथे एक व्यक्ती महिलेची छेड काढताना दिसला. त्यांनी त्याला जाब विचारताच त्याने दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांशीही असभ्य वर्तन करण्यात सुरवात केली. याची गंभीर दखल घेत दामिनी पथकाने इतर सहकाऱ्यांना बोलावून त्याला थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर तेथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बंडगार्डन व कोरेगाव पार्क दामिनी पथकातील महिला कर्मचारी खान, सोनवणे, अत्राम यांच्या पथकाने केली.