मुंबई – ‘बिग बॉस 16’ या रिअॅलिटी शोद्वारे भारतातील लोकांची मने जिंकणारा ताजिकिस्तानचा अब्दु रोजिक आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अब्दू टीव्ही सीरियल ‘राधा मोहन’मध्ये दिसणार आहे.
अब्दू लवकरच या मालिकेत दिसणार आहे. हे समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. बिग बॉसचा हा सीझन एमसी स्टॅनने जिंकला असला तरी प्रेक्षकांची मने अब्दुने जिंकली होती.
रिपोर्टनुसार, अब्दू शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय स्टारर ‘प्यार का पहला नाम: राधा मोहन’ मध्ये दिसू शकतो. आगामी एपिसोडमध्ये, मोहन आणि तुलसीच्या मुलीच्या गुनगुनच्या वाढदिवसाची पार्टी असेल. दरम्यान, दामिनी गुनगुनचे अपहरण करण्याचा विचार करेल आणि त्यासाठी ती अब्दूला सुपारी देईल. अब्दू या शोमध्ये कायमस्वरूपी राहणार नाही, पण त्याची छोटी भूमिका असेल.
अब्दू रोजिक काही दिवसांपूर्वी ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. या शोमध्ये त्यांचा मित्र शिव ठाकरे सहभागी होत आहे. अब्दू त्याला पाठिंबा देण्यासाठी केपटाऊनला गेला होता. अब्दू आणि शिवच्या मस्तीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अब्दुच्या टीमने स्टेनवर अनेक आरोप केले. एका शोदरम्यान स्टेनने अब्दूला आत जाऊ दिले नाही, असे त्याने सांगितले. याशिवाय अब्दुच्या गाडीचीही स्टेनच्या फॅन्सने तोडफोड केली.